पालघर हत्याकांड; कारवाईसाठी भाजपाचे निवेदन
कारंजा लाड — दि २३ (कारंजा हुंकार )
कारंजा: पालघर जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची जमावाने पोलिसांच्या समक्ष काठ्यांनी मारून हत्या केली. या मॉब लिंचिंग घटनेच्या निषेधार्थ २२ एप्रिल रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष ललित चांडक यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तहसीलदार,कारंजा यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.
निवेदनानुसार या घटनेला जबाबदार व घटनास्थळी उपस्थित पोलिस कर्मचार्यांकडे साधूंनी संरक्षणाची याचना केली असताना त्यांना वाचविण्याचा कोणताही प्रयत्न न करणार्या पोलीस कर्मचार्यांना या प्रकरणात आरोपी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची करण्यात आली. या आधीही ठाणे येथे पोलिसांनी एका हिंदुत्ववाद्याला त्याच्या घरातून उचलून नेऊन मंत्र्यांच्या बंगल्यावर बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाली होती. तुकाराम आबळे यांच्या बलिदानाने उंचावलेली पोलीसदलाची मान अशा घटनांमुळे कलंकित होऊन खाली जात आहे.
संतांची भूमी म्हणवणार्या महाराष्ट्राला कलंकित करणार्या घटना आहेत. वारंवार हिंदूंना लक्ष्य करणार्या या हिंसक घटना रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पालघर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणार्या हिंसक जमावासह, संबंधित पोलिसांवरही ३०२ चा गुन्हा नोंद करावा, तसेच दोषी पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
सरकारने याविषयीची नेमकी माहिती जनतेला द्यायला हवी. लॉकडाऊनच्या दळणवळण बंदी काळात पालघर येथे शेकडो लोकांचा जमाव रात्रीच्या वेळी जमून लाठी-काठ्यांसह बाहेर येतो काय आणि संत पोलिसांकडे संरक्षणाची विनंती करत असतांना त्यांची निघृण हत्या करतो, हे हादरवून टाकणारे दृश्य आहे. श्री पंचदशनाम जुना आखाडा हा देशातील १३ आखाड्यांपैकी सर्वांत मोठा आखाडा आहे. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सरकारने या प्रकरणी त्वरीत चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कारंजा यांच्यावतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर पं.स.सदस्या तथा गटनेत्या सौ.वैशाली विजय काळे, नगरसेविका सौ.प्राजक्ता उमेश माहितकर, नगरसेविका सौ.चंदाताई भिमराव कोळकर, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष महेंद्र लोडाया, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष विजय काळे, माजी शहराध्यक्ष संदीप गढवाले, पं.स.सदस्य शुभम बोनके, किशोर धाकतोड, शशिकांत वेळुकर, ललित तिवारी, संदीप काळे, तेजपाल भाटीया, ईश्वर डेंडुळे, मोहन पंजवाणी, संदीप कुर्हे, अतुल धाकतोड, जिग्नेश लोडाया, मनोज शिवाल, राजेश रोडे, राजेंद्र शामसुंदर, साहेबराव वाकोडे, चंद्रकांत भोपाळे, संदीप बेलबागकर, विपीन बोनके, राहुल देशमुख आदींच्या स्वाक्षर्या आहेत.