जि.प मराठी व उर्दू शाळेत पोषण आहाराचे वितरण
सोशल डिस्टन्सिंगचेे केले पालन
उंबडाॅबाजार ( वार्ताहर )
येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा तथा जिल्हा परिषद विद्यालयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकांसह, शाळा समिती सदस्य यांनी नियोजन बद्ध पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण करण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत शाळेतील वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुनेद सर, शाकीर सर तथा जिल्हा परिषद विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक मिलींद खडसे ,विजय मापारी , अर्जुन चव्हाण , गणेश भागवत , दिनेश इंगळे , प्रा .तकीक यांचे सह शिक्षकेतर कर्मचारी आदींनी पोषण आहार आहाराच्या वितरणासाठी महत्त्वाची भुमिका बजावली .
.याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्याना कोरोना संसर्गापासून बचावासाठी घेण्याच्या दक्षते बाबत मार्गदर्शन करण्यात आले. शालेय पोषण आहार वितरणाच्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षासह सदस्यगण व विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांच्या पालकांची ही उपस्थिती होती.
जि.प मराठी व उर्दू शाळेत पोषण आहाराचे वितरण सोशल डिस्टन्सिंगचेे केले पालन