एकमेकांमये योग्य अंतर ठेवुन डाॅ आंबेडकर जयंती साजरी
कारंजा लाड — ( कारंजा हुंकार)
जिल्ह्यातील दापुरी (कालवे) ता. मालेगांव येथे एकमेकांमध्ये योग्य अंतर राखून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर समाजमंदिरामध्ये सामूहिक त्रिशरण , पंचशील घेण्यात आले. या वेळी केशव कांबळे, प्रभावती कांबळे, वामनराव कांबळे, कस्तुराबाई कांबळे, वैभव कांबळे आणि गावकऱ्यांची उपस्थिती होती.