श्री संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने गरजू नागरिकांना जिवनावश्यक वस्तुचे वाटप
उबर्डा बाजार प्र. डिगांबर काळेकर कारंजा हुंकार
कोरोना विषाणु जन्य आजारामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन घोषीत झाल्यामुळे गरजु गरीब नागरीकाचे कामधदे बद आहेत. त्यामुळे नागरीकाचे हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल होत असल्यामुळे श्री संत गजानन महाराज संस्थान(ट्रस्ट )E276 (क) तीर्थक्षेत्र उंबर्डाबाजार वतीने जिवनाश्यक वस्तुचे जवळपास दोनशे च्या वर गरजुंना वाटप करण्यात आले.
सविस्तर असे की नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहणा-या श्री संत गजानन महाराज संस्थान(ट्रस्ट )E276 (क) तीर्थक्षेत्र उंबर्डाबाजार यांच्या वतीने कोरोणा या विषाणु जन्य आजारामुळे अनेक अपंग , निराधार , बाहेर राज्यातुन व्यवसायानिमित्त गावात मुक्कामी असलेले व्यावसायिक , कामधंदा तथा व्यवसाय बंद असलेल्या गरजू गरवंत नागरिकांचा शोध घेवुन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले .
कोरोणा या विषाणु जन्य आजाराच्या संकटसमयी श्री संत गजानन महाराज संस्थान(ट्रस्ट )E276 (क) तीर्थक्षेत्र उंबर्डाबाजार यांनी गोरगरीब गरजू गरवंत नागरिकांना केलेली मदत इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे.
श्री संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने गरजू नागरिकांना जिवनावश्यक वस्तुचे वाटप
• ankush kadu