कामरगाव ग्रा पं ची दिव्यांगांना 2 लाख 92 हजारांची मदत
65 दिव्यांगांना लाभ, धनादेशाद्वारे मदत वितरण
कामरगांव धनराज उटवाल ( कारंजा हुंकार )
कारंजा पं स अंतर्गत येत असलेल्या कामरगाव ग्रा पं ने कोरोना संचारबंदी काळात दिव्यांगांना 2 लाख 92 हजारांची मदत केली. याचा 65 दिव्यांगांना लाभ मिळाला असून प्रत्येकी 4 हजार 500 रूपयाचा धनादेश देण्यात आला. गेल्या महिनाभÚयापासून देशासह राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने 25 मार्च पासून केंद्र सरकारच्या वतीने लाॅकडाउुन घोषित करण्यात आले आहे. हे लाॅकडाउुन 3 मे पर्यंत सुरू राहणार असल्याने दिव्यांगांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रा पं मध्ये दिव्यांगांसाठी 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. त्या राखीव निधितून ही मदत करण्यात आली. 65 दिव्यांगांना 2 लाख 92 हजार 500 रूपयांचा निधी वितरित करण्यात आला. यावेळी स्थानिक सरपंचा सुरेखा देशमुख, उपसरपंच मसोयोद्दीन जहिरोद्दीन, तलाठी विवेक नागलकर व सचिव गोपाल मिसाळ उपस्थित होेते. धनादेश वाटपादरम्यान कोरोना संचारबंदीतील सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. ऐन संकटाच्या काळी दिव्यांगांना निधी मिळाल्याने त्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.