जिल्हाबंदीचा नियम तोडणार्या ट्रॅक्टर चालकावर महसूल विभागाची कारवाई
ट्रॅक्टर जप्त, 188 नुसार गुन्हा दाखल
कामरगाव प्रतिनीधी धनराज उटवाल कारंजा हुंकार
कामरगांव---कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा सिल करण्यात आल्या असून, जिल्हाबंदी करण्यात आली आहे. या कोरोनाच्या संचारबंदीत हीरपूर येथून गिट्टी भरून एका ट्रॅक्टर चालकांने पोलीसांची नजर चुकवून छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश केला. सदर प्रकरणी महसूल विभागाने ट्रॅक्टर चालकावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला असून, ट्रॅक्टर जप्त केला आहे. प्रविण डांगे रा. हिरपूर असे त्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. सदरची कारवाई मंडळ अधिकारी देवेंद्र मुकुंद व तलाठी विवेक नागलकर, वरघट, गुगळे, यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल मसके, श्यामल ठाकुर,रवि राजगुरे, सुनील टाले, दिपक खंडारे, करित आहे.