किन्नर श्रावणी हिंगासपुरे यांच्याकडून 16000 रुपयाची शासनाला मदत
कारंजा लाड दि २३ कारंजा हुंकार
संपूर्ण जग कोरोना सारख्या विषाणू च्या विळख्यात अडकलेले आहे. त्यामुळे सगळे कडे लॉक डाऊन सुरू आहे. यात गोरगरीब सामान्य माणसावर उपासमारीचे वेळ येऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते कडून अन्न धान्य वाटप करण्यात येत आहे. तर कारंजा शहरातील रहिवासी असलेली किन्नर श्रावणी हिंगासपुरे हिने 11000 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधी ला तर कारंजा शहर पोलीस स्टेशनला 5100 रुपये सहायता म्हणून कारंजा चे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे रोख स्वरूपात दिले.