वाशीम जिल्हातील केशरी कार्डधारकांना रेशन द्या अंकुश कडु
वाशीम —. वाशीम जिल्हातील हजारो केशरी कार्ड धारक अपात्र आहेत. सध्या कोरोना सारखा महा भयंकर विषाणूने थैमान घातले आहे केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केलेला असल्याने अनेक गोरगरीब ज्यांचे हातावर पोट आहे असे अनेक जण घरात बसून आहेत. ज्यांना रोज कमवल्या शिवाय गत्यंतर नाही असे हातावर पोट असणारे तसेच जे अत्यंत गोरगरीब लोक आहेत. अशा लोकांची सध्या मोठी अडचण निर्माण झालेली आहे. अश्या अपात्र केशरी कार्ड धारकांनाही अन्न धान्य किमान तीन महिन्यासाठी मिळावे अशी मागणी अंकुश कडु यांनी केली आहे . केंद्र व राज्य सरकारने अशा गरजू व गोरगरीब लोकांसाठी मोठ्या प्रमाणात रेशनिंगचा माध्यमातून अन्न व धान्य उपलब्ध करून देण्यास सुरूवात केलेली आहे. वाशीम जिल्हातील कारंजा मानोरा मालेगांव रिसोड मगरुपीर वाशीम तालुक्यात रेशन दुकान मधून सध्या फक्त अंत्योद्य व अन्न सुरक्षा पात्र असलेले कार्ड धारकांनाच धान्य वितरीत केले जात आहे. त्यामुळे सध्या केशरी अपात्र कार्ड धारक तसेच ज्यांचाकडे कसलेच रेशनींग कार्ड नाही अश्या नागरीकांना प्रत्यक्षात गरज असूनही आपत्कालीन परिस्थितीत रेशनींगचे धान्य मिळत नाही. सध्या तरी तीन महिन्यासाठी अपात्र केशरीकार्ड धारक यांना अन्न धान्य मिळावे. अशी मागणी अंकुश कडु यांनी केली आहे.