उंबडाॅबाजार (वार्ताहर )
सर्वञ कोरोना विषाणू जन्य आजार धुमाकूळ घालत असताना त्यावर मात करण्याकरिता उत्तम आरोग्य राहण्यासाठी दुघोरा येथे जागतिक आरोग्य दिन शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरा करण्यात आला.
पाणी म्हणजे जीवन व प्रत्येकाला स्वछ व शुध्द पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे खासकरून आज प्रत्येकजण घरीच राहत असल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत दुघोरा अंतर्गत पाणी पुरवठा कर्मचारी मंगेश चाटे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गावाचे सरपंच सोपान बांडे, प्रतिष्ठित नागरिक श्याम पाटील, रुपराव सोनोने, अविनाश भगत, शरद बांडे, सचिन काजे,सचिन पंडीत, बंडु भगत सोशल डिसट्नशिंग राखून उपस्थित होते.
दुघोरा येथे जागतिक आरोग्य दिन साजरा
• ankush kadu