कमी खर्चात जास्त उत्पन्न म्हणजे हंळद .
नितीन उपाध्ये
काजळेश्वर येथे हळद काढणीला सुरवात
प्रतिनीधी काजळेश्वर उपाध्ये : ( कारंजा हुंकार )
पारंपारीक शेतीला फाटा देत काही शेतकरी हळदीच्या पीकाकडे काजळेश्वर येथे
वळले असून सद्या हळद काढणीच्या कामाला वेग आला आहे .
प्राप्त माहीतीनुसार काजळेश्वर शेत शिवारात सोयाबीन तूर कापूस मूंग उडीद गहू हरभरा अशी पारंपारीक पीकेे शेतकरी घेतो . या
साठी पीक रक्षण महत्वाचे आहे रोही डुकरं हरण :वानरं इत्यादी वण्ये
प्राण्याच्या त्रासाला शेतकरी त्रस्त झाला आहे .सदासर्वदा शेतातच पहारा द्यावा लागतो त्यामुळे याकरीता पर्याय म्हणून येथील काही तरुण शेतकरी हळद पीकाकडे वळले आहे
गावातील सात- आठ तरूण शेतकऱ्यांनी हळदीची पेरणी केली होती . सध्या हळद काढणीचे काम शेतात जोरात सुरु आहे या पीका बाबत येथील तरुण शेतकरी नितीन पाटील उपाध्ये म्हणाले की माझ्या सव्वा एकराच्या शेतात जवळपास दिडसे क्विंटल ओली हळद झाली इतर पीकाचे तुलनेत हळद शेतकऱ्यांना परवडते . दुसऱ्या पीकात खर्च आणि रखवालीचा त्रास आहे यात खर्च कमी आणि त्रास ही कमीच आहे .वण्यप्राण्याला वाव नाही . फायदेशीर पीक व रोख पीक म्हणून या पीकाकडे बघाव . जरूर दोन ते चार एकर पर्यन्तची शेती हळदीपिकासाठी वापरावी फायदाच होईल असे मत नितीन पाटील उपाध्ये यांनी प्रदर्शित केले .