धनज बु बँकांसमोरील गर्दी जैसेथे
धनज बु प्रतीनिधी ( कारंजा हुंकार )
अगोदर सलग तीन दिवसांचा सुट्ट्या , सोमवारी बँक सुरु होती त्यानंतर पुन्हा एक दिवसाची सुट्टी आल्यामुळे बँकांसमोरील गर्दी मात्र अजून हि जैसेथे च आहे...शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये व महिलांच्या जनधन खात्यात 500 रुपये आले असल्यामुळे ते पैसे काढण्यासाठी ग्राहकांकडून बँकसमोर एकच गर्दी होताना दिसून येत आहे...या गर्दीत मात्र सोशल डिस्टन्स च कुठलं हि भान ग्राहकांना दिसून येत नासल्याचे निदर्शनात येत आहे...त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी अखेर बँक च्या कर्मचार्यांना पोलिसांना पाचारण करावं लागलं आहे..त्यामुळे थोड्या का प्रमाणात होईना लोकांना कडून शिस्तीचे पालन होत आहे...शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयार सद्या सुरु आहे...त्यामुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे..