गोरगरीबांचे झोपडी पर्यन्त कारंजा ग्रामीण पोलीसांनी पोहचविला मदतीचा हात
खाकीने दिला माणुसकीचा परिचय
ठाणेदार दिगांबर इंगळे यांचा पुढाकार
उंबडाॅबाजार प्रतिनीधी ( कारंजा हुंकार )
कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर उपाध्ये येथे आदिवासी गोंडसमाजाचे वस्तीत
अपंग निराधार गरजू आदीवासी नागरिकांना कारंजा ग्रामीण पोलीसांनी दि. १६ एप्रिल रोजी धान्य वितरण करून जनमानसात एक आदर्श निर्माण केला.
सविस्तर असे की कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिगंबर इंगळे यांच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ;गाडगे महाराज यांच्या विचाराचा चांगलाच पगडा असुन कोरोणा या विषाणु जन्य आजाराच्या कठीण काळात कुणी गरीब उपाशी पोटी राहु नये . यासाठी लाॅकडाउन च्या काळात लक्ष ठेवुन आहे .भुकेल्याला अन्न मिळावे करीता काजळेश्वरातील भटकंती करणारे आदीवासी गोंडसमाजाचे लोक कोरेणा विषाणू संसर्गाचे भितीने गावात आलेत आणि झोपडी पालात
रहात आहेत .
फिरस्ती व्यवसाय करीत असल्याने अनेकांकडे रेशनकार्ड नाही उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार इंगळे तथा स . फौ . सुभाष
जाधव ;पोहेकॉ . सुभाष सोनोने ;नापो कॉ . शिवाजी काळे ;पो कॉ . मदन सानप .पो कॉ . मुंदे यांनी निराधार अपंग असहाय कुंटूबाना धान्य देऊन मानुसकीचा परीचय दिला .पोलीसांनाही भावना आहेत मन असल्याचा परिचय आपले कर्तव्य बजावत असतांना दाखऊन दिल्याने इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे