काजळेश्वरची इडीयन पोष्ट पेमेंट बैक ठरली लोक डाऊनचे काळात ग्राहकासाठी वरदायी .
पोष्ट मास्टर दिपक चौधरी यांचे उल्लेखनीय कार्य .
काजळेश्वर उपाध्ये प्रतिनीधी नकुल उपाध्ये
: लॉक डाऊनच्या काळात शासनाने सर्वसामान्यांना दिलेल्या सर्व उपयुक्त
आर्थिक योजनांच्या सेवा सर्वसामान्यापर्यन्त काजळेश्वर येथील
इंडियन पोष्ट पेमेंट बँकेतर्फे पोष्ट मास्टर दिपक चौधरी ; पोष्टमन कैलास टाले
खातेदारांना पुरवित आहे .
प्राप्त माहीतीनुसार एईपीस द्वारे प्रधानमंत्री गरीब कल्याण निधी गावात खातेदारांना
बँकेत गर्दी न करता पोष्ट ऑफीस मधून दिल्या जात आहे . प्रत्येकाच्या आरोग्याची सुरक्षा हयाला प्राथमिकता देत कोरोनाविरुध्दच्यलढयात इंडियन पोष्ट पेमेंट बॅक काजळेश्वर सेवेतअग्रणी आहेत . त्यात संजय गांधी निराधार योजना : श्रावन बाळ निवृत्तीवेतन योजना ;इंदीरा गांधी वृद्धापकाळ सहाय्ययोजना ;अपंग निवृत्तीवेतन योजना ;प्रधानमंत्री जनधन योजना ;गॅस सबसीडी ;शेतकरी स्वाभीमान योजना जेष्ठ नागरिक इत्यादी शासनाच्या गरीब कल्याण योजनाचा निधी गर्दी न होऊ देता सोशल डिस्टन्सींग द्वारा
लाभार्थाना दिला जातो . आजपर्यन्त
काजळेश्वर पोष्ट बँकेत२५० खातेधारकांनी खाते काढले असून आधारकार्ड दाखविल्यावर आंगठयाचा ठसा घेतल्या जातो व
संचार बंदीच्या काळात खातेदाराच्या प्राथमिक गरजा करीता लागणारा पैसा दहा हजार रुपया पर्यन्त चा आर्थिक व्यवहार पोष्ट बँकेतून होतो याबरोबरच कुठेही कोणत्याही बँकेत
रक्कम ट्रान्स्फर करता येते किवा कोणत्याही बँकेतील रक्कम दहा हजार रूपयापर्यन्त काढता येते त्यामुळे गावातूनच तालूका किवा कोठेही असलेल्या बँकेचा व्यवहार करता येतो असे पोष्ट मास्टर दिपक चौधरी यांनी सांगितले . या कामी त्यांना पोष्टमन कैलास टाले मदत करीत आहे . इंडीयन पोष्ट पेमेंट बॅकचे पोष्ट मास्टर यांनी लॉक डाऊनच्या काळात संचारबंदीत पुरवित असलेल्या सेवा उल्लेखनीय असल्याने खातेदार समाधानी आहेत .